Ad will apear here
Next
योगक्षेमं वहाम्यहम्


अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

अनन्यभावाने जो माझं स्मरण, चिंतन, पूजन करतो. मला भजतो, त्याच्या योगक्षेमाची चिंता मला वाहावीच लागते. मी त्याच्या दैनंदिन योगक्षेमाची काळजी घेत असतो.

श्रीमद्भगवद्गीतेतील सगळ्यात शेवटचा श्लोक मला नेहमीच मोहवून टाकतो. भगवंताचे सातत्यपूर्ण स्मरण हेच भवसागर तरून जाण्यासाठी उपयुक्त ठरतं. हा श्लोक मी एखाद्या मंत्रासारखाच मानतो. मला या श्लोकाचा अतिशय उत्तम अनुभव आला आहे. हा मंत्रच आहे. एका करांगुलीवर गोवर्धन पर्वत तोलून धरून भगवंताने गोकुळाचं रक्षण केलं. कारण, सबंध गोकुळाची अढळ श्रद्धा भगवंतांवर होती.

रोज ११ वेळा किमान आणि कमाल १०००पेक्षा अधिक वेळा या मंत्राचा जप करावा. ईशस्मरण करावं. कर्मसिद्धान्तावर विश्वास ठेवून शांतपणे आपलं विहीत कर्म करावं आणि चिंतामुक्त होऊन भगवंत खरोखरच योगक्षेमाची काळजी कशी घेतात त्याचा अनुभव घ्यावा.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EVFUCU
Similar Posts
‘...परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो’ गीतेतील कृष्णापेक्षा माउलींचा कृष्ण अधिकच मनोज्ञ आहे... अर्जुनाच्या प्रश्नांवर उचंबळून येणारा, त्या सगळ्या प्रश्नांमुळे निर्माण होणारी आंदोलनं न सांगता जाणणारा... सख्या अर्जुनाच्या मनोरथाचे लगाम कधी खेचत... कधी सैल सोडत योग्य दिशेने नेणारा... त्यासाठी भरभरून बोलणारा...
दीपे दीप लाविला... श्रीकृष्णाच्या अमोघ वाणीचा आणि अर्जुनाच्या अपूर्व बुद्धीचा मनोज्ञ संगम गीता-उपदेशाच्या रूपाने घडून आला होता. परंतु माउली म्हणतात, त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचण्यास वाणीही अपुरी पडते आणि बुद्धीचाही शिरकाव न झाल्याने तीही असमर्थ ठरते. म्हणूनच ती आत्मवस्तू देण्याकरिता भगवंतांनी आता आलिंगनाचे निमित्त केले
गरुडकवच एकंदरीत आयुष्यातील निरुत्साह हा अनेकांना खूप त्रासदायक वाटत असतो. अनेकांच्या कार्यालयात निरुत्साही, निगेटिव्ह वातावरण असते. अनेकांना नैराश्याचा (डिप्रेशन) त्रास होतो. त्यातून मधुमेह, ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवतो. काहींना नेत्रविकार असतात अशांसाठी आणि ज्यांना कालसर्प योग आहे (पण आत्ता लगेचच शांती करणं
नामाचा महिमा समाधीचा पाया म्हणजे ध्यान (Meditation) हा आहे. ध्यानाचं अंतिम टोक हे समाधी असलं, तरीही मुळात ध्यानामागची कारणमीमांसा अतिशय व्यावहारिक आहे, ती म्हणजे स्वतःला एकटं पाडणं, काही क्षण एकटं राहणं. जन्माला आल्यापासून एक तर हे जग आपल्याला एकटं राहू देत नाही किंवा आपणच धो धो करत गर्दीत मिसळायला बघतो.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language